
सावंतवाडी : कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित आहेत. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले अर्चना घारे या माझ्या लहान बहीणीसारख्या आहेत. त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं जिल्हाध्यक्ष म्हणून करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागे आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही याची खंत आहे. पण, त्या खचल्या नाहीत. सतत काम करत राहिल्या. सत्ता असो वा नसो त्यांचा मतदारसंघातील झंझावात त्यांनी कायम ठेवला. कार्यकर्ते उभे करण्याच काम त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला आमदार झालेली नाही. महिलांचा आमदार निवडून देत पुढच्या १ डिसेंबरला आमदार म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करू अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.