जामसंडेत १८ ऑगस्टला रानभाजी महोत्सव !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 17, 2023 10:45 AM
views 273  views

देवगड : कै.मोरेश्वर जनार्दन गोगटे, सांस्कृतिक भवन, जामसंडे येथे १८ ऑगस्ट रोजी माजी आमदार ॲड.अजित गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या रानभाज्या महोत्सव मध्ये रानभाज्यांचे औषधी गुणधर्म व रोजच्या आहारात रानभाज्यांचा वापर याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


या रानभाज्या महोत्सवामध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री तसेच रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये उमेद अभियान आणि माविम यांच्याकडील महिला बचतगटांचा समावेश असणार आहे. तरी या प्रदर्शनास भेट देऊन औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा आपल्या रोजच्या आहारात वापर वाढावा याकरिता आपण व आपल्या परिवारास उपस्थित राहण्यासाठी कैलास ढेपे, तालुका कृषी अधिकारी, देवगड यांनी विशेष आवाहन केले आहे.