तळेबाजार शाळेत भरलं रानभाज्या प्रदर्शन...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 13, 2023 18:22 PM
views 104  views

देवगड : मुलांना राणभाज्यां विषयी समजावे व पावसाळ्यात आपल्या आजूबाजूच्या परिसरात रुजून येणाऱ्या रानटी भाज्यांची माहिती मिळावी म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर,तळेबाजार.येथे रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या वेळी,मुख्याध्यापक नंदन घोगळे सर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत परिसरातील रानभाज्यांची माहिती देत त्यांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात तसेच पोषण आहारात यांचा समावेश असावा असे आवाहन पालक वर्गाला केले.

विविध आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारामध्ये रानभाज्यांचे महत्त्व याबाबतचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. टाकळा, कुर्डू, कारली, करटोली, कटला पेवगा, अळू या सारख्या विविध प्रकारच्या भाज्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने मांडण्यात आल्या होत्या .