
कणकवली : रिगल कॉलेज कणकवली येथे विद्यार्थांमध्ये पारंपरिक खाद्यसंस्कृती बद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रानभाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्या तृप्ती मोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख अतिथी म्हणुन रिगल कॉलेज कणकवलीचा माजी विद्यार्थी तसेच युवा उद्योजक आणि चिकन एक्सप्रेस हॉटेलचे मालक अजय नांदोस्कर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित केले.
विद्यार्थांनी पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण कल्पनाच्या सहाय्याने काही रानभाजी पदार्थ सादर केले जसे, पेवग्याचे कबाब, अळूवडी, मिक्स रानभाजी, भजी, ओव्याच्या पानाची भजी, अळूचे विविध पदार्थ, बांबुची भजी, रानभाजीने स्टफ केलेले रॅविओली पास्ता तसेच स्पर्धेचे आकर्षण एकपणाचे आईस्कीम असे चवदार आणि नाविन्यपूर्ण पदार्थ उपस्थित स्पर्धक विद्यार्थ्यांनी बनवले.
स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरली जिच्यातून परंपरेची जपणूक आरोग्याचे महत्व आणि सर्जसनशीलता यांचे सुंदर उदाहरण साकारले गेले. तसेच रानभाजी स्पर्धा आयोजित २०२५ - २६ या स्पर्धेच्या नियोजनामध्ये सांस्कृतिक विभाग प्राध्यापिका तसेच प्राध्यापक वर्ग यांच्या निदर्शनाखाली संपन्न झाला.