
सावंतवाडी : आंबोली येथील जकातवाडी येथे रानटी हत्ती दिसून आला. अनिल चव्हाण यांच्या घरासमोरील झुडूपातून तो निघून गेला. यावेळी वन विभागाच्या वन क्षेत्रपाल प्रमिला शिंदे, वनरक्षक वासुदेव खोत, बदाम राठोड, वसंत गावडे, बाळा गावडे, शिवराम गावडे रेस्कू टीम चे प्रथमेश गावडे, राकेश अमृस्कर यांनी याठिकाणी पाहणी केली. मात्र, हत्ती काळोखात घुटमळत राहिला. काही वेळाने तिथेच तो दिसून आला.