सिंधुदुर्गात कोणाचा करिष्मा..?

Edited by: भरत केसरकर
Published on: November 06, 2023 12:33 PM
views 1576  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील  पाच पैकी वावावल हुमरमळा, वर्दे या दोन ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वर्चस्व मिळवले. तर वालावल आणी भडगाव भाजपने दोन ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवला आहे.

तर बहुचर्चित हुमरमळा-अणाव ही एक ग्रामपंचायत ही गाव पॅनलकडे गेली आहे.तर मालवण तालुक्यातील आचरा ही प्रतिष्ठेची समजली जाणारी एकमेव ग्रामपंचायत भाजपने एक हाती मिळविली आहे.त्यामुळे कुडाळ मालवण मतदार मतदारसंघातील सहापैकी तीन ग्रामपंचायती भाजपकडे,दोन ग्रामपंचायती ठाकरे शिवसेनेकडे तर एक ग्रामपंचायत गाव पॅनलकडे गेली आहे.

कुडाळ तालुक्यातील भडगाव ग्रामपंचायतीवर विजय मिळवत भाजपने आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का दिला आहे.आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहायक असलेले बाबी गुरव यांच्या हातातून ही ग्रामपंचायत निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक असलेले प्रितेश गुरव यांनी खेचून घेत करिष्मा केला आहे....