
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील ४५ पैकी ४५ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा दावा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी केला आहे. तर माजगाव ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार डॉ. अर्चना सावंत या भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मडुऱ्यात गेली १५ वर्ष माझ्या नेतृत्वाखाली सरपंच निवडून येत असून यावेळी रेकॉर्ड ब्रेक होईल. विजयाचा गुलाल भाजपच उधळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, सरपंच पदाच्या उमेदवार डॉ. अर्चना सावंत, अजय सावंत आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.