
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच मुळ गाव भालावल इथं गाव विकास युवा पॅंनल मैदानात उतरले आहे. सकाळपासून मतदारांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, गावात गाव विकास युवा पॅंनलची हवा असून सरपंच पदाचे उमेदवार समिर परब यांच्यासह ७ ही सदस्य निवडून येतील, असा विश्वास अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला. तर भालावलसह विलवडे, कोनशी दाभीलमध्ये महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नक्कीच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला
तर माझा विजय १०१ टक्के निश्चित आहे. त्याचबरोबर गाव विकास युवा पॅंनलचे सात सदस्य निवडून येतील असा विश्वास सरपंच पदाचे उमेदवार समीर वासुदेव परब यांनी व्यक्त केला. यावेळी गाव विकास युवा पॅंनलचे प्रमुख मंडळी उपस्थित होते.