
सावंतवाडी : तलावाच्या संरक्षक भिंतींच भुमिपूजन मंत्री दीपक केसरकर यांनी केल ही सावंतवाडी शहरासाठी चांगली गोष्ट आहे. परंतु, तलाव गाळ काढताना सर्वपक्षीयांची बैठक घेण्यात आली होती. सर्वांनी यात मदत केली होती. मात्र, मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतः व स्वतःच्या कार्यकर्त्यांना घेऊन भुमिपूजन केल हे योग्य वाटत नाही. भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे तेवढाच अधिकार आमचा बनतो. परंतु, भाजपच्या कार्यकर्त्यांना भुमिपूजन प्रसंगी बोलावल नाही. जर असं असेल तर ग्रामपंचायतीत युती करण्यासाठी मागे लागलात तसेच उद्या होणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेत मागे लागू नका. तुम्ही एकटेच लढा, तेव्हा राजन तेलींना फोन करू नका. तेव्हा सुद्धा एकट्यानं लढा, जसं एकट्याने भुमिपूजन केल अस आव्हान भाजप जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मंत्री केसरकर यांना दिलं.
या आधीच्या उद्घाटनांना केसरकर यांचे पदाधिकारी आम्हाला फोन करायचे, नगरपरिषद अधिकारी सुद्धा फोन करायचे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच आहे. त्यामुळे अभियंता अनामिका चव्हाण यांनी नाटक बंद करावीत असा इशारा दिला. तर सत्ता काय असते हे त्यांना दाखवून देऊ असा इशारा दिला.
छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पैसे येऊन त्याच उद्घाटन देखील झालेलं नाही. नाथ पै नाट्यगृह, सेल्फी पॉईंट आदी काम अर्धवट असून ती कुणीतरी थांबवली आहेत. निवडणूका नंतर थांबलेली काम आम्ही निश्चिंत सुरु करू, झारीतला शुक्राचार्य कोण हे दोन दिवसांत जाहीर करेन असं मत व्यक्त केले. तर केशवसुत कट्टा धोकादायक असल्याचा रिपोर्ट ज्या प्रशासनानं दिला तेच आज दबावाखाली येऊन काम करत आहेत. याठिकाणी जिवीत वा वित्त हानी झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहील. तर मी आमदारकीसाठी इच्छुक आहे. पक्षानं संधी दिली तर निवडणूक लढवणार, आमदारकी लढवायची माझी इच्छा आहे. पक्षानं दिल तर लढू, इतर कुणाला दिल तर प्रामाणिकपणे काम करू असं मत संजू परब यांनी व्यक्त केले. यावेळी दिलीप भालेकर, सत्या बांदेकर आदी उपस्थित होते.