पर्यावरण विषयक उद्धीष्ठ साध्य करत असताना मनुष्य हानी होणार नाही याची गांभीर्याने दाखल घेणं गरजेचे : अँड. परिमल नाईक*

Edited by: विनायक गावस
Published on: September 27, 2023 16:35 PM
views 120  views

सावंतवाडी : शहरात काल रात्री भेडलेमाड झाड कोसळून दोन तरुण युवकांचा झालेला अपघाती मृत्यू ही घटना अतिशय गंभीर व मन हेलवणारी आहे. शहरात अनेक ठिकाणी धोकादायक व जीर्ण स्वरूपात जुनाट झाडे अस्तित्वात आहेत. काही झाडे तर कधीही पडण्याच्या अवस्थेत आहेत. भविष्यात मनुष्य हानी व गंभीर अपघात टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने त्वरित पालिकेच्या वृक्ष समिती द्वारे सर्वेक्षण करून घोकादायक झाडे तोडण्याची मोहीम आखावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा माजी सभापती अँड. परिमल नाईक यांनी नगरपरिषद प्रशासना कडे केली आहे.