दोडामार्ग : गेले 7 ते 8 महिने अवजड वाहतुकीसहीत एसटी वाहतूक बंद असलेला तिलारी घाट दुरुस्त होत नाही तो पर्यंत तिलारी घाटातून एसटी बस वाहतूक सुरु होणार नाही अशी माहिती कोल्हापूर एसटी वाहतूक नियंत्रक अनिल मोरे यांनी कोकणसाद LIVEशी बोलताना सांगितले. त्यामुळे तिलारी घाट दुरुस्त होणार की? ग्रामस्थांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागणार हे पाहण तितकेच महत्वाचे आहे.
साधारण 7 महिन्यांपूर्वी गोवा, दोडामार्ग, चंदगड कोल्हापूरला जाणार तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी 31 ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार असे पत्र दिले होते. त्यामुळे दोडामार्ग बेळगांव- कोल्हापूर अशी एसटी वाहतुकही या वेळी बंद झाली. दरम्यान ही एसटी वाहतूक सुरु व्होवी या मागणी साठी तालुक्यातील व चंदगड येथील काही ग्रामस्थांनी आंदोलने, उपोषणे केली. मात्र लोकशाही मार्गने केलेल्या आंदोलनाचा फायदा झाला नाही. उलट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच वेळ काढला जातं आहे. कोल्हापूर एसटी विभागचे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मोरे म्हणतात की तिलारी घाटातील काही वळणावर संरक्षक कठडे कोसळलेले आहेत. ते कठडे नव्याने बांधकाम केले जाईल आणि त्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागकडून येईल त्या नंतरच या घाटातून एसटी बस वाहतूक सुरु करण्यात येईल असे म्हणाले.
कोल्हापूर एसटी वाहतूक निरीक्षक अनंत चिले 8 दिवसांपूर्वी तिलारी घाटातून एसटी बस ची चाचपणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले की या ठिकाच्या काही ग्रामस्थांनी धोकाडायक वळणावरील रस्ता रुंदीकरण केलेला आहे. त्यामुळे धोकादायय असे काही वाटत नाही. दोन दिवसात या घाटातून एसटी बस सुरू करण्यात येईल असे त्यांनी त्यावेळी सांगितले. मात्र, दहा दिवस झाले तरी या तिलारी घाटातून एसटी बस सेवा सुरू झाले नाही. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर विभागीय वाहतूक नियंत्रण विभागाचे अधिकारी अनिल मोरे यांना संपर्क केला असता. ते कोकणसाद LIVE शी बोलताना म्हणाले की तिलारी घाटातील काही धोकादायक वळणावर संरक्षक कठडे तुटलेले अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी सिमेंटचे संरक्षक कठडे बांधण्यात यावेत त्यानंतर या तिलारी घाटातून एसटी बस सेवा सुरू करण्यात येईल असे ते म्हणाले. मग एकीकडे वाहतूक निरीक्षक अनंत चिले तिलारी घाट वाहतुकीस योग्य आहे तर दुसरीकडे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मोरे सांगतात तिलारी घाट एसटी वाहतुकीस धोकादायक आहे. तिलारी घाटाची डागडुजी होत नाही तोपर्यंत एसटी सुरू होणार नाही असे मोरे म्हणतात. तर या दोन्ही अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय? की लोकांची दिशाभूल करण्यासाठी अधिकाऱ्यांचा घाट आहे ? असा सवाल उपस्थित होतोय.
कोल्हापूर प्रशासनची नेमकी भूमिका काय : प्रवीण गवस
ज्यावेळी तिलारी पाटबंधारे प्रकल्पाने आपल्या सोयीसाठी तिलारी घाट मार्ग सुरू केला. त्यावेळी हा घाट मार्ग कोणत्याही प्रशासनाच्या ताब्यात न होता. एसटी बस वाहतूक सुरू होती. त्यावेळी काही वर्षात हा किल्लारी घाट मार्ग वाहतुकीस अक्षरशः धोकादायक बनला होता. त्यावेळीही सुद्धा सर्व अवजड वाहतुकी सहित एसटी वाहतूक सुरू होती. तीस वर्षात एसटीचा एकही अपघात पडला नाही. हा तिलारी घाट मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्याला कोट्यावधी रुपये खर्च करून हा घाट मार्ग दुरुस्त करण्यात आला. एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून वाहतुकीस धोकादायक बनला आहे जाहीर करते? हाही प्रश्न सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी उपस्थित केला आहे. आंबोली घाट मार्गाला संरक्षक कठडे नसताना ही सर्व प्रकारची वाहतूक सुरू आहे. मग तिलारी घाटातच घोड कुठे पडायला लागलं हेही तितकच महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोल्हापूर प्रशासन जाणून बुजून तिलारी घाट मार्ग बंद करण्याच्या हालचालींकडे लक्ष केंद्रित करत असल्याचा थेट आरोप प्रवीण गवस यांनी केला आहे.