सावंतवाडी नगरपरिषदेच्या घड्याळामध्ये 12 कधी वाजणार..?

नागरिकांचं आहेच, पालिकेचं कधी लक्ष जाणार ?
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 22, 2022 10:19 AM
views 295  views

सावंतवाडी : गेले कित्येक दिवस पावणे तीनवर नगरपरिषदेचे घड्याळ बंद पडून राहिलेलं आहे. नगरपरिषदेच्या घड्याळात कधी बारा  वाजतील, या अपेक्षेत सावंतवाडीतील नागरिक आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली सावंतवाडी नगरपरिषद आणि खास करून मोती तलावाच्या काठी असल्याने पर्यटनासाठी एक खास आकर्षणाचा भाग ठरलेला आहे.  या शहरांमध्ये दररोज येणारा पर्यटक, आजूबाजूच्या गावातून येणारे नागरिक तसेच शहरातील नागरिक यांचं सर्वप्रथम लक्ष सावंतवाडी नगरपरिषदेच्या घड्याळाकडे जातं. आता नगरपालिकेचं लक्ष याकडे कधी जातं, याचकडं लक्ष लागून आहे.