काय वाडी, काय कोकण...शहाजी बापुंची दमदार एन्ट्री ! पहिलीच प्रतिक्रिया दिली महाचॅनेलला !

आमदार शहाजीबापू पाटील यांचं सावंतवाडी इथं जोरदार स्वागत
Edited by: विनायक गांवस
Published on: October 15, 2022 18:20 PM
views 425  views

सावंतवाडी : युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार तथा काय झाडी, काय डोंगर फेम आमदार शहाजीबापू पाटील सावंतवाडीत दाखल झाले. यावेळी भाजप नेते माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून बापूंच गवळी तिठा इथं जंगी स्वागत करण्यात आले. संजू परब यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. तर दीपक केसरकर समर्थक अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देखील शहाजी बापूंच स्वागत केल.

यावेळी कोकणचं नं १ महाचॅनेल कोकणसाद LIVE ला त्यांनी खास प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोकण हा महाराष्ट्राच्या काळजाचा घड आहे. इथला निसर्ग हा सर्वांनाच आवडतो. उध्दव ठाकरे यांनी माझयावर कोकणची जबाबदारी टाकली होती. त्यावेळी कोकणातील प्रत्येक गावनगाव मी पिंजुन काढले होते. राजु बेग यांना याची कल्पना आहे. श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्यासाठी कॉलेजच्या पटांगणावर सभेसाठी मी आलो होतो. त्यामुळे कोकण आणि सावंतवाडीशी माझे जुने नाते आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेलाही कोकणातुनच सर्वांत मोठा प्रतिसाद मिळाला आहे.