न.प.चा बांधकाम विभाग करतोय काय ?

दुर्घटनेची बघतायत का वाट ? ; शहरवासीयांचा सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: July 22, 2025 18:04 PM
views 158  views

सावंतवाडी : शहरातील नारायण मंदिरसमोर मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा नागरिकांच्या रोषानंतर नगरपरिषदेनं बुजवला होता. मात्र, पावसात चार दिवस सुद्धा न.प.चं कॉक्रीट टिकाव धरू शकल नाही. अपघातांना आमंत्रण देणारा हा खड्डा अखेर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बुजवला. मात्र, पुन्हा एकदा अपघाताला आमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. रसत्याखालील भाग खचत असल्याची शक्यता असल्याने न.प.चा बांधकाम विभाग काय करतोय ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

तिनं दिवसांपूर्वी न.प.च्या डागडुजी नंतर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी येथे सिमेंट कॉक्रीट करून खड्डा भरला होता‌. मात्र, पुन्हा एकदा खड्डा पडला असून या रसत्या खालील भाग खचत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे न.प.चा बांधकाम विभाग मोठी दुर्घटना होण्याची वाट बघत आहे का ? असा सवाल सावंतवाडीकरांनी केला आहे. तात्काळ यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी केलेला हा रस्ता खड्डेमय होत आहे. नगरपरिषदेच्या तोंडा समोरच खड्डे पडत आहे. ठेकेदारांकडून केलेले रस्ते, नंतरची मलमपट्टी वर्षभर सुद्धा टिकत नसल्याने रस्त्यातल डांबर नेमकं जातय कुठे ?असा सवाल देखील उपस्थित होत आहे.