
कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार व आमदार नितेश राणे यांना मुस्लिम समाजाच्या लोकांचा पाठिंबा आहे आणि तो कायम राहणार. आमदार नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही ते देश द्रोहिच्या विरोधात बोलतात आज पर्यंत त्यांनी मुस्लिम समाजाला भरपूर प्रमाणात मदत केली आहे. विजयी घोडदौड कोणी रोखू शकत नाही ते शंभर टक्के हॅट्ट्रिक करणार असे कणकवली अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी म्हटले आहे.
आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आज जे बोलत आहेत ते त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. आपली पोळी भाजली. मुस्लिम समाजाला पुढे आणण्यासाठी काय केले ते सांगावे. राणे कुटुंबीय मुस्लिम समाजातील अनेक लोकांना आर्थिक शैक्षणिक भरपूर प्रमाणात मदत केली आहे. तुम्ही काय केले ते सांगा असा सवाल यावेळी बटवाले यांनी केला.
या मतदार संघाचा विकास दहा वर्षांत त्यांनी भरपूर प्रमाणात केला आहे.ऐवढा विकास निधी एखादा मंत्री सुद्धा आणू शकत नाही. आज प्रत्येक गावात वाडी मोहल्ला येथे त्यांनी विकास केला आहे.म्हणून लोकाचा ओघ त्यांच्याजवळ आहे असही बटवाले म्हणाले.