
देवगड : देवगड तालुक्यातील महात्मा गांधी विदयामंदीर तळेबाजार हायस्कुलमध्ये नवागत विदयार्थ्यांच्या स्वागताचा प्रवेशोत्सव व मोफत पाठयपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी व्यासपिठावर तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, खजिनदार संतोष वरेरकर, सदस्य बाळकृष्ण पारकर, विश्वास सावंत, मुख्याध्यापक राजेश वाळके, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नविन शैक्षणिक वर्षात शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांना ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पुष्पवृष्टी करत सभागृहामध्ये नेण्यात आले. नवागत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे गुलाब पुष देऊन स्वागत करण्यात आले. त्याबरोबर शासनामार्फत पुरवि०यात येणाऱ्या मोफत पाठयपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी खजिनदार संतोष वरेरकर मुख्याध्यापक राजेश वाळके, पालक दत्तप्रसाद जोईल यांनी विदयार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच दुपारच्या सत्रात नवागत विदयार्थ्याच्या स्वागत निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मृण्मयी जाधव तर नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख जोईल सर यांनी केले.