मिलाग्रीस हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत...!

Edited by: विनायक गांवस
Published on: June 16, 2025 15:47 PM
views 166  views

सावंतवाडी : मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथील प्रशालेमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचे स्वागत जल्लोष व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सुरुवातीला रंगीत फुग्यांचे दालन तयार करून शालेय इमारतीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून वर्ग खोल्यांमध्ये शिक्षकांच्या  मदतीने बसविण्यात आले. स्वागत समारंभाच्या सुरुवातीलाच प्रशालेचे  मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व प्रार्थना गीताने शालेय वातावरणाची निर्मिती करीत परिपाठाचे सादरीकरण करण्यात आले तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या काही गरीब होतकरू व निवडक विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भंडारा मार्फत मोफत गणवेश व वह्यांचे  वाटप माननीय मुख्याध्यापकांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी ' स्टार'या शब्दाच्या संकल्पनेतून शाळेतील विविध उपक्रम व स्पर्धांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने या नवीन संकल्पनेच्या फलकाचे अनावरण माननीय मुख्याध्यापकांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचड सालदाना यांनी नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत करीत या शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या वेळी पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी इंग्लिश प्रायमरी पर्यवेक्षिका क्लीटा परेरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.दीप वारंग यांनी केले तर आभार रोजा फर्नांडिस  यांनी मानले.