
सावंतवाडी : उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा एकदा गजबजल्या असून सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं 'वेलकम' करण्यात आल. अनोख्या पद्धतीने शिक्षकांकडून मुलाचं स्वागत करण्यात आल. उन्हाळी सुट्टीनंतर सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वगत करण्यात आल. मुलांच्या स्वागतासाठी शाळा सजविण्यात आली होती. नव्यान केजीत प्रवेश करणाऱ्या बालकांसह 1 ते 10 वी च्या विद्यार्थ्याच वर्गशिक्षकांकडून तोंड गोड करत पहिल्या दिवशी स्वागत करण्यात आल. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सहाचं वातावरण पाहायला मिळाल. यावेळी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष इम्तियाज खानापुरी, संचालक म़ंडळासह मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, शिक्षिका स्मृती गवस, मारिया पिंटो यांनी स्वागत केले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.