रोटरी सायक्लोथॉनचे देवगड इथं स्वागत

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 26, 2024 14:40 PM
views 56  views

देवगड : रोटरी क्लब ऑफ चेन्नई कोरात्तूर क्लबचे सतीशकुमार, शांकरी यांनी चेन्नई ते मुंबई गेट वे ऑफ इंडिया हा सुमारे दोन हजार किलोमीटर टप्पा सायक्लोथॉन या उपक्रमाद्वारे सायकलवरून प्रवास करत मानसिक आरोग्य जनजागृती आणि आणि पोलिओ निर्मूलनाचा संदेश दिला. तसेच शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत मानसिक आरोग्य, मनोरुग्ण, पोलिओ निर्मूलनाबाबत जनजागृती केली. या सायक्लोथॉद्वारे जनजागृती करत आलेल्या सदस्यांचे देवगड येथे शुक्रवारी स्वागत करण्यात आले.

यावेळी देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्यावतीने प्रेसिडेंट श्रीपाद पारकर, अनुश्री पारकर, मनस्वी घारे, अनिल कोरगावकर, सुनील पारकर, नरेश डामरी, विजय बांदिवडेकर, दयानंद पाटील अनिल गांधी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ चेन्नईचे सतीश कुमार व त्यांचे सहकारी शांकरी यांनी सायकल प्रवास उद्देश अनुभव जनजागृती याबाबतची माहिती रोटरी क्लब ऑफ मैंगो सिटी देवगडच्या पदाधिकाऱ्यांना व पत्रकारांशी संवाद साधत दिली. यावेळी फ्लॅग एक्स्चेंज करण्यात आला. चेन्नई ते गेट ऑफ इंडिया ४० या दिवसांच्या सायक्लोथॉनला २३ फेब्रुवारीला रोटरीच्या वर्धापन दिनी चेन्नई येथून सुरुवात करण्यात आली होती. सहा राज्यातून हा सायकल प्रवास करण्यात येऊन ६० क्लबना भेटी देण्यात आल्या. २२ मार्चला देवगड येथे येईपर्यंत ३५ क्लबला भेट देण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी आमचे स्वागत करण्यात आले. आम्हाला नवनवीन मार्गावरील सायकल प्रवास अनुभवता आला, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, मालवण या ठिकाणी भेट देत देवगड येथे नियमित ५० ते ६० किलोमीटर अंतर पार करत आम्ही दाखल झालो आहोत. येथून सागरी मार्गाने रत्नागिरी येथे जाणार असल्याचे सतीशकुमार यांनी सांगितले.