पंतप्रधान पीक विमा योजनेच्या प्रचार चित्ररथाचं दोडामार्गात स्वागत

Edited by: संदीप देसाई
Published on: July 21, 2023 20:24 PM
views 70  views

दोडामार्ग : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या प्रचार चित्ररथाचे स्वागत शुक्रवारी तहसीलदार संकेत यमगर यांच्या हस्ते दोडामार्ग तहसील येथे करण्यात आले. खरीप हंगामासाठी भात व नाचणी पिकांचा समावेश यात आहे.

यावर्षीच्या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्याना फक्त १.०० रू. मध्ये भात पिकासाठी ५१,७६० रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. त्यात अतिवृष्टी, गारपीट, ढगफुटी, भूस्खलन, काढणी पश्चात नुकसान यापासून शेतकरी यांचे पीक संरक्षित होणार आहे. यासाठी ७/१२ व ८अ( पिकाची नोंद असलेला),आधार कार्ड,बँक पासबुक, पिकाचे स्वयं घोषणापत्र, ई पीक पाहणी बंधनकारक आहे. विमा उतरवयाची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. यासाठी सर्व शेतकरी यांनी आपले सरकार सेवा केंद्र,जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, राष्ट्रीयकृत बँका,किंवा स्वतःच्या मोबाईलद्वारे http://pmfby.gov.in या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज दाखल करावे. दिनांक २२ जुलै रोजी पीक विमा चित्र रथ कुडासे, साटेली भेडशी, कोनाल, हेवाळे, बांबर्डे, तेरवण-मेढे, मोर्ले, केर, तळेखोल, वझरे तसेच दिनांक २७/०७/२३ ला कळणे, उगाडे, कोलझर, तळकट, झोलंबे, फुकेरी या मार्गाने विमा प्रतिनिधी सह शेतकरी यांचे अर्ज भरून घेण्यासाठी फिरणार आहे. सर्व शेतकरी यांनी आपले विमा योजनेचे अर्ज ऑनलाईन करण्यासाठी संबंधित कृषी सहायकाकडे सादर करण्याचे आवाहन कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी केले आहे.