बांद्रा मडगांव नव्या रेल्वे गाडीचे सिधुदुर्ग - सावंतवाडी स्थानकावर स्वागत...!

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 30, 2024 11:36 AM
views 428  views

सिंधुदुर्गनगरी :  रेल्व बोर्डा ने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिधुदूर्ग सावंतवाडी थांबा देण्यात आला आहे. ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मध्यरात्री दोन वाजता ही गाडी सिधुदुर्ग व त्यानंतर सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. यावेळी प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणिरेल्वे कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडी चे  जंगी स्वागत केले.

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ही गाडी बोरिवली - वसई  अशी सुरू करावी यासाठी प्रयत्न केले होते. रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिधुदूर्ग , सावंतवाडी थांबा देण्यात आला आहे. कोरोनाकाळात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे थांबे काढून घेतल्याने मोठी गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रवासी संघटनेने आंदोलन, उपोषण करून प्रशासनाला जाग आणली होती. यानंतर रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली. त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिधुदु र्ग , सावंतवाडी थांबा देण्यात आला आहे. काल मध्यरात्री दोन वाजता सिधुदुर्ग तर अडीच वाजता ही गाडी सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडीच  जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी रेल्वे कर्मचारी प्रवाशीआदी उपस्थित होते.

दरम्यान, संघटनेच्या लढ्याला आज खूप मोठं यश मिळालं आहे. बोरीवली-सावंतवाडी, ब्रांदा ते मडगाव गाडीला सिधुदुग , सावंतवाडी स्थानकात थांबा मिळाला आहे. यासाठी रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानण्यात येत आहेत . तसेच सुशोभीकरण आणि काहीजलद गाडयाना सिधुदुर्ग वैभववाडी सावंतवाडी सह रेल्वे स्थानकावर थांबे पीआरओ सिस्टीम सुरु केली तर येणारा काळ या स्टेशन साठी निश्चितच चांगला असेल, कोकणवासियांचा प्रवास निश्चितच सुखकारक होईल आणि रेल्वेच्या आर्थिक प्रगती गती येईल तसेच कोरोणामध्ये बद पडली दिवा रत्नागिरी मडगांव ही पहाटे रत्नागिरी येथून ४ वाजता सुटल्यास तसेच काही जलद गाड्या थांबे अन्यरेल्वेच्या सुशोभीकरण व आवश्यक सुविधा उपलब्ध केल्यास प्रवाशांची होणारी गैरसोय दुर होईलअसा विश्वास सिधुदुर्ग रेल्वे प्रवाशी समन्वय संघर्ष समिती अध्यक्ष प्रकाशपावसकर सिधुदुर्गस्टेशनचे अध्यक्ष शुभमपरबयांनीव्यक्त केलेआहे. व या प्रश्नी लवकरच खासदार नारायणराणे आमदार वैभव नाईक , नितेश राणे यांच्यासह प्रशासकिय अधिका ऱ्याचे लक्ष वेधणार आहे व याची दरवल न घेतल्यास गणपतीनंतर पुढील दिला ठरविण्याचे बैठकित ठरल्याचे ते म्हणाले