नव मतदारांचे स्वागत...!

Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2024 15:07 PM
views 170  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव मतदारांचे सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी सभापती उदय नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या या मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. विकसित भारतासाठी तसेच आत्मनिर्भर भारतासाठी आम्ही मतदान केले अशा प्रकारची प्रतिक्रिया या नव मतदारांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात आले होते. त्यातही या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. सकाळी सकाळीच नव मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावलेल्या दिसून आल्या. यावेळी शहरातील वॉर्ड नं. ६ मध्ये माजी नगरसेवक उदय नाईक यांनी नव मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करीत मतदानाचा पवित्र हक्क बजावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या मतदारांनीही उदय नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.