आठवडा बाजार पुन्हा वादात ; मंत्री केसरकर-भाजपात मतभेद !

केसरकरांनी 'या'चा विसर पडू देऊ नये : राजन तेली
Edited by: विनायक गांवस
Published on: February 14, 2023 12:49 PM
views 425  views

सावंतवाडी : शहरात ७२० दिवसांच्या कार्यकाळात भाजपची सत्ता असताना भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आठवडा बाजार मोती तलाव काठावर आणला होता. कोरोनानंतर गेली दोन वर्षे हा आठवडा बाजार तलाव काठावर भरत आहे. दरम्यान, संत गाडगेबाबा महाराज मंडईच्या पुनर्बांधणीच्या बैठकीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हा बाजार हलविणार असल्याच जाहीर केल. जुन्या बाजारात अर्थात होळीच्या खुंटावर या पुढच्या काळात हा आठवडा बाजार भरेल. मी सुंदर केलेला हा काठ आठवडा बाजारामुळे विदृप दिसायला लागतो. तलाव विदृप होण हे मला कधीही आवडणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केले होत.


दरम्यान, आठवडा बाजाराच्या मुद्यावरून भाजप आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच दिसून येत आहे. तुम्ही आमदार आहात पण, पालकमंत्री आमचे आहेत. प्रशासकीय राजवटीपुर्वी या ठिकाणी भाजपची सत्ता होती याचा विसर पडू देऊ नका. शहरात कोणताही निर्णय घेताना भाजपला बरोबर घेण गरजेचं आहे याची आठवण केसरकरांना करून देणार असल्याचं वक्तव्य राजन तेलींनी केलय. त्यामुळे आठवडा बाजाराच्या मुद्यावरून भाजप आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यात मतमतांतरे दिसून येत असून भाजपला विश्वासात न घेता केसरकर निर्णय घेत असल्याचं दिसून येतं आहे.


याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली म्हणाले, या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे आहेत. कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेताना पालकमंत्र्यांशी चर्चा करण गरजेच आहे. त्याचबरोबर या नगरीत संजू परब भाजपच्या निशाणीवर निवडून आले होते. दहा नगरसेवक भाजपचे होते. त्यामुळे शहरात कोणताही निर्णय घेताना भाजपला बरोबर घेण गरजेचं आहे याची आठवण केसरकरांना करून देणार असल्याचं राजन तेली यांनी स्पष्ट केले. तर व्यापाऱ्यांच पुनर्वसन व्हाव ही संजू परब यांची मागणी योग्य आहे. त्यांच चांगल पुनर्वसन करा, ठराविक लोकांना सांगण्यापेक्षा सर्वांना एकत्रित घेऊन पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांची मदत घेऊन एकत्रित पणे विकास करण्यासाठी लोकांनी भाजपवर विश्वास टाकला होता याचा विसर कुणी पडू देऊ नये. सर्वांनी एकत्र येऊन व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ‌. शहरातील लोकांना त्रास होता नये, सुंदर शहराचा विसर कुणी पडू देऊ नये. सर्वांच्या विचारानं मध्यवर्ती ठिकाणी हा आठवडा बाजार भरवला जावा अस मत तेलींनी व्यक्त केल.


माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, काही लोक मला भेटली. हा बाजार आहे तिथेच राहुदेत, होळीच्या खुंटावर नको. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही, गर्दी होणार. तर आताच हे मध्यवर्ती ठिकाण आहे. होळीचा खुंट एका बाजूला पडतो. बाजार आहे तिथेच असावा अशी मागणी त्यांची आहे. त्यामुळे लोकांच्या या मागणीला आमचं समर्थन आहे, असं मत संजू परब यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज, आनंद नेवगी,, महेश धुरी आदी उपस्थित होते.