
कुडाळ : कोकणात युवा सेनेची ताकद आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वाढली आहे. भविष्यात युवा सेनेची ताकद आपल्याला वाढवायची आहे एकत्रित काम केल्यास शिवसेना पक्षाला त्याचा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी युवा विजय महाराष्ट्र दौरा कार्यक्रमात केले. युवा सेना सिंधुदुर्ग युवा विजय महाराष्ट्र दौरा कणकवली कुडाळ मालवण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा मेळावा कुडाळ येथील महालक्ष्मी लक्ष्मी हाॅल येथे संपन्न झाला.
यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, आ.निलेश राणे, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा प्रमुख संजय पडते, कोकण युवा सेना निरीक्षक राहुल अवघडे, संग्राम साळसकर, राज्य सचिव किरण साळी, जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, जिल्हाप्रमुख हर्षद ढेरे, युवासेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवासेना कार्याध्यक्ष सरनाईक म्हणाले कोकणात युवा सेनेची ताकद निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वाढली आहे युवकांच्या माध्यमातून उद्याचा महाराष्ट्र हा सुंदर घडेल . त्यावेळी झेंडे लावणे मोटर सायकल रॅली काढणारा शिवसैनिक हा फक्त शिवसैनिकच राहिला होता आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राजकारणात शिवसैनिकांना सन्मान मिळत आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यातील शिवसैनिकांना उमेदवार म्हणून संधी मिळत आहे हीच खऱ्या अर्थाने युवकांना मिळालेली प्रेरणा म्हणावी लागेल राज्यात सर्व दौरा करताना आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा सेनेची वेगळी ताकद आपल्याला पाहायला मिळाली एकत्रपणे काम केल्यास शिवसेना पक्षाला या युवा सेनेचा फायदा होणार आहे या भागाचे दमदार नेतृत्व कार्यसम्राट आमदार निलेश दादांना सर्वांनी साथ दिली पाहिजे पक्ष संघटना मोठी करण्यासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे असे सांगत आजची युवासेना ही भविष्यातील शिवसेना असल्याचे सांगितले.
दिपक केसरकर म्हणाले की, तुम्हा युवकांचा मला अभिमान आहे.आपण एक असे युवक कार्यकर्ते बनलं पाहिजे ज्यांचा आम्हा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे.
आ.निलेश राणे म्हणाले की, कुठल्याही पक्षात युवकांना संधी देण्याचे काम राजकारणात युज आणि थ्रो केलं जातं पण आपल्या या शिवसेनेत पुर्वेश सरनाईक तुम्ही यूवकांना व्यासपीठ देण्याचं चांगले काम करत आहात, राजन तेली यानी विद्यार्थी संघटनेत असताना स्वतः ते परशुराम उपरकर यांनी विद्यार्थी संघटनेपासून विद्यार्थी संघटनेपासून काम सुरू केलं
मी स्वतः राज ठाकरे भारतीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते तेव्हा मी त्या संघटनेत होतो. आम्ही त्यावेळी सिनेटच्या निवडणूक वेळी झेंडे सुद्धा लावले. त्यावेळी खुप मजा होती, ती संघटना म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, पण आता पुर्वीची काहीच मजा नाही, पुर्वेश व माझ्या वडीलांनी संघर्ष बघितला. त्यांना खरी शिवसेना कळाली. माझे वडील राजकारणात उतरले तेव्हा त्यांच वय अवघं १६ होते, फाॅर्म भरताना १८ वर्ष वय होतं. बाळासाहेब ठाकरेंचा त्यावेळी झंझावात होता, अनेकांनी त्यावेळी अनेकांनी रक्त सांडलं, घाम गाळला, म्हणूनच शिवसेना संघटना उभी राहिली.कालांतराने शिलसेनेत कोण नगरसेवक,आमदार, खासदार, मंत्री झाले. बाळासाहेब ठाकरेंनी सर्वांना मदत करणारी संघटना शिवसेना स्थापन केली. मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावरून उतरणार होते, त्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री कसे झाले त्यांचा किस्सा सुद्धा यावेळी आ.निलेश राणे यांनी सांगंत हे केवळ शिवसेनेत होऊ शकतं. काॅग्रेसमध्ये नगरसेवक म्हातारे होतात. बाकीच्या पक्षांबाबत काही बोलायलाच नको कारण आपण अलायन्स मध्ये आहोत असे सांगत त्यांनी भाजपचे नाव घेणे टाळले. सन 1990 मध्ये नारायण राणे शिवसेना चिन्हावर त्यावेळी कणकवली मतदार संघ असताना आमदार झाले. दुसऱ्या युनिटमध्ये मला धनुष्यबाणच मिळाला आणि मी आमदार झालो. केवढं मोठं हे भाग्य आहे हे मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. संघटनेत जो कोणी उद्योग असेल त्याला आत्ताच शोधा उद्योजक झाला तर आनंदाची गोष्ट आहे. संघटना पाच जणांची असू देत पण ती जीवाभावाची असली पाहिजे. कुणाला घाबरणारी आपली संघटना असता कामा नये. अठरा दिवस निवडणुकीच्या अगोदर आलेल्या उमेदवाराला राजन तेलींसारखे असंख्य कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांना शिवसेना चिन्हावर आमदार बनवले आणि नंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तुम्ही कार्यकर्ते समाजामध्ये कसे जाता ते महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यांवर नेता बनतो, नुसता नेता महत्त्वाचा नाही. संघटना ही जीवाभावाची बांधा. आमच्या घरावर सुद्धा प्रसंग आलेत त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्राची शिवसेना सिंधुदुर्गात आली. त्यावेळी मुंडे डोंगरीला सर्वात मोठी सभा झाली, तुम्ही अशा शिवसेना संघटनेचे कार्यकर्ते आहात हे लक्षात ठेवा. आज दोन आमदार आमचे आहेत. हे समोर बसलेले सर्व वाघ आमचा किल्ला लढवत आहेत. संघटना आम्ही जीवाच्या पलीकडे जपणार आहोत. तुम्ही मैदानात उतरण्यासाठी मागेपुढे पाहू नका आदेशाची वाट पाहू नका एकनाथ शिंदे साहेबांना आपली गरज आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे शिवसेना ही पद सर्वात मोठं आहे. हे सर्व पद जातील पण शिवसेनाही पद कोणीही काढू शकत नाही. मी सुद्धा आमदार नंतर पहिला शिवसैनिक आहे. तुम्हाला संघटनेचे वेड लागलं तर आपली शिवसेना जिवाभावाची उभी राहील. चारही बाजूला संघटना उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. पण संघटना उभी करताना ती प्रेमाने उभी करा. कुणावरही अन्याय होईल असं काही करू नका असे आवाहन आ.राणे यांनी केले.
राजन तेली म्हणाले की,आज युवा सेना नशिबवान आहे,कारण सत्ता आपली आहे, त्यामुळे काम करण्यासाठी तुम्हा मुलांना मोठी संधी आहे. आता युवा सेनेने संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणं आवश्यक आहे.त्यासाठी पुढाकार घ्या आणि गावागावात संघटना वाढवा असे आवाहन केले. संग्राम साळसकर म्हणाले की, कुडाळ विधानसभा मतदारसंघात सध्या ४०० युवासेनेचे पदाधिकारी कार्यरत आहेत, येत्या दोन -अडीज महिन्यात चार ते साडेचार हजार कार्यकर्ते युवासेनेचे तयार करू असा विश्वास व्यक्त केला. या मेळाव्यात युवासेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावशी शेलटेवाडीमधील उबाठा शिवसैनिकांनी प्रवेश केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम साळसकर, निवेदन दादा साईल, दत्ता पाटील यांनी केले.











