मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था

विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 15, 2024 10:53 AM
views 125  views

सावंतवाडी : विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेच्यावतीने पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. देवदूत असलेले डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर, समीर शेख, लक्ष्मण देऊसकर, काशी गावडे, एकनाथ गवळी, सुधीर नाईक, अजय सावंत, बाबू राऊळ, प्रकाश जाधव, काका कारिवडेकर, निलेश कोळेकर, संतोष हरमळकर, सखाराम मांजरेकर, दिलीप मातोंडकर, साईराज राणे उपस्थित होते.

डॉ.दुर्भाटकर यांनी प्रत्येकाने आपल्या घराच्या बाहेर, बिल्डींगच्या खाली दोन घास खाऊ व पाणी ठेवल्यास पशुपक्षी मुक्या प्राण्यांना फायदा होईल व आपल्याला आशिर्वाद मिळेल असे आवाहन केले. गेली 35 वर्षे समाजसेवा करणाऱ्या मंगेश तळवणेकर व त्यांच्या टिमला शुभेच्छा दिल्या. डोंगराळ भागात व शहरात ठेवलेली पाण्याची भांडी संघटनेचे त्या-त्या भागातील सभासद भरणार आहेत अशी माहिती मंगेश तळवणेकर यांनी दिली.