पाणीटंचाई ठिकाणी दीपक केसरकर मित्र मंडळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा : राजन पोकळे

Edited by: विनायक गावस
Published on: June 10, 2023 13:24 PM
views 110  views

सावंतवाडी : पाळणेकोंड धरणात 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे तूर्तास तरी शहराला कोणत्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही अशी भूमिका सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे मांडली.

दरम्यान ज्या ठिकाणी पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी दीपक केसरकर मित्र मंडळ व नगर परिषदेच्या माध्यमातून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे असे त्यांनी सांगितले.  सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे त्यामुळे शहराला पाणीटंचाईचे संकट भेडसावणार आहे असे वृत्त प्रकाशित झाले होते.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने श्री पोकळे यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने भूमिका मांडली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिल्या त्यात  त्यांनी असे म्हटले आहे की सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणात  पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे सद्यस्थितीत दररोज 30 लाख लिटर पाणी शहराला दिले जाते तीच परिस्थिती कायम ठेवण्यात येणार असून दिवसातून दोन वेळा पाणी नियमित सुरू आहे.

तुर्तास तरी धरणार 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची पाणी कपात केली जाणार नाही त्यामुळे पाणीटंचाईचे संकट जाणवणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तर ज्या ठिकाणी उंच भाग आहे अशा काही ठिकाणी पाणी पोहोचत नाही अशा दीपक केसरकर मित्र मंडळ व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा टँकरच्या बाजूला सुरळीत सुरू आहे