युवासेनेकडून दारिस्ते बौद्धवाडीत टँकरने पाणीपुरवठा

दारिस्ते बौद्धवाडी ग्रामस्थांनी मानले उत्तम लोके याचे आभार
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 27, 2024 06:10 AM
views 288  views

कणकवली :तालुक्यातील दारिस्ते गावातील बौद्धवाडी येथे पिण्याच्या पाण्याची होणारी टंचाई व त्यामुळे ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेत युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके यांनी स्वखर्चातून पाण्याची कमतरता भासे पर्यंत मोफत पाणी पुरवठा करणार असल्याचे आश्वासन देऊन पाणी पुरवठा तातडीने सुरू केला आहे. दरिस्ते बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दूर केल्यावर ग्रामस्थानी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, शिवसेना शाखाप्रमुख अविनाश गांवकर, युवासेना शाखाप्रमुख विजय गांवकर, संदीप गांवकर आदी उपस्थित होते.