सावंतवाडीतील काही भागात पाणी टंचाई | सुरेश भोगटे यांनी वेधलं लक्ष

Edited by: विनायक गावस
Published on: July 30, 2023 11:46 AM
views 159  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील माठेवाडा भागात नळ पाणीपुरवठा करणारी लाईन नादुरुस्त झाल्याने परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे असे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सांगितले.

उभा बाजार चितारआळी च्या काही भाग, वैश्यवाडाचा काही भाग गेले दोन दिवसापासून पाण्यापासून वंचित आहे. कलावती मंदिर कडून माठेवाडा येथे येणारी पाण्याची लाईन फुटल्याने नागरिकांची पाण्यापासून तारांबळ उडाली ही बाब येथील नागरिकांनी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने सुरेश भोगटे यांनी नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी श्री भाऊ भिसे लाईनमन लाखे यांना सकाळी पहाटे धारेवर धरले. पाणी लोकांना मिळत नसल्याबाबत जाब विचारला तात्काळ टँकरने पाणी देण्यासाठी भाग पाडले तसेच तात्काळ लाईन दुरुस्तीची मागणी केली मात्र दोन दिवस लाईन फुटून झाले असून सुद्धा रिपेरिंग का होत नाही दोन दिवस कशाला अशा अनेक प्रश्न करून अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यावर वॉटर सप्लाय च्या अधिकाऱ्याने तात्काळ लाईन दुरुस्तीची करून काम मार्गी लावतो व पाणीपुरवठा पूर्ववत करतो असे सांगितले.