
सावंतवाडी : शहरात आज सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसानं नागरीकांची त्रेधातिरपीट उडवून दिली. शहरासह ग्रामीण भागात देखील पावसानं थैमान घातलं. सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत जयप्रकाश चौक ते चंदुभवन परिसरात पाणी साचले होते. तर परिसरातील दुकानांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी साचले होते.
सहसा कधीही न तुंबणारी बाजारपेठ या एक दोन वर्षांत अनेकदा तुंबू लागली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात व्यवस्थित गटारे साफ न केल्यामुळे हा प्रकार घडत असून वारंवार बाजारपेठेत पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत.