कणकवली शहराला २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 19, 2024 04:53 AM
views 616  views

कणकवली : गेल्या वर्षी  जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाल्याने कणकवलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. यावर्षी देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण पुढील 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा पंप हाऊस ठिकाणी  शिल्लक आहे. आणि जपून वापरण्याची गरज आहे. मागील वर्षी अशीच परिस्थिती उद्भवल्याने शहरातील काही भागांमध्ये एक दोन दिवस आड पाणी सोडले जात होते तसेच शहरामध्ये असणाऱ्या विहिरीने  देखील तळ गाटलेले होते. आणि काही नगरांमध्ये टँकरने देखील पाणी पुरवण्यात आले होते.

त्यामुळे यंदाही जर पाऊस उशिरा पडला तर कणकवलीकरांना पाणी टंचाईची समस्या भासू शकते कारण 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असून दिवसाला 30 लाख लिटर पाणी कणकवली शहराला लागते आणि  1700 नळ कनेक्शन शहरात आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. दरम्यान, शिवडाव येथील धरणाचे पाणी नदीपत्रात सोडले जावे यासाठी नगरपंचायतीने लघु पाटबंधारे विभागाकडे पत्रकार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.