
कणकवली : फोंडाघाट विभागातील वीज समस्यांबाबत सरपंच संजना आग्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाºयांची भेट घेत घेतली. त्यांच्यासमोर प्रलंबित वीज समस्यांचा पाढा वाचला. १० जुलैपर्यंत वीज समस्या न सुटल्यासह ग्रामस्थ आंदोलन छेडतील, असा इशारा शिष्टमंडळाने दिला.
यावेळी उपसरपंच तन्वी मोदी, मिलिंद लाड, सुभाष सावंत, स्नेहलता पांचाळ, मिलिंद लाड,प्राची धुरी, जयेश भोगले तसेच सोसायटी चेअरमन राजन नानचे आदी उपस्थित होते.
फोंडाघाट परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अपुºया वायरमनमुळे ही दूर होण्यास विलंब होतो. फोंडाघाटसाठी कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता उपलब्ध व्हावा. गावातील वीज ग्राहकांचा स्मार्ट मीटर बसविण्याला विरोध आहे. फोंडाघाट अभियंताविना असल्याने वीज ग्राहकांना वाºयावर सोडले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवसा रस्त्यावरील दिवे सुरू असतात. मात्र, रात्रीचे बंद असतात. खंडित वीजपुरवठ्यामुळे नळ पाणी योजना फटका बसत आहे. विजेच्या खेळखोडबांमुळे व्यावसायिक त्रस्त आहेत. पावसाळ्यापूर्वी कामे न केल्यामुळेच वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याला महावितरणाचा आनागोंदी कारभार जबाबदार आहे. परिसरातील लोखंडी पोल जीर्ण झाल्याने कधीही अपघात होण्याची शक्यता आहे, अशा व्यथा त्यांनी महावितरण्याच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला.










