कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या 'पर्यावरण फेंड्ली बाप्पा स्पर्धेवर’ ‘वार्ड क्रमांक १’ चे वर्चस्व

घरगुती गणेश सजावट स्पर्धेसह स्वच्छ वार्ड स्पर्धेतहि मिळविला अव्वल क्रमांक गटप्रमुख निधी नाईक, समीर रेडकर, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, सागर नाईक यांनी स्वीकारला सन्मान
Edited by: संदीप देसाई
Published on: January 27, 2024 13:39 PM
views 61  views

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतमार्फत यावर्षी  गणेश उत्सवात आयोजित करण्यात 'पर्यावरण फेंड्ली बाप्पा स्पर्धा २०२३' या स्पर्धेवर शहरातील ‘वार्ड क्रमांक १’ वर्चस्व राहिले. घरगुती गणेश सजावट स्पर्धेत शहरातील वार्ड क्रमांक १’  चे रहीवाशी सुहास मनोहर परब यांनी तर एकूण  १७ वार्ड पैकी स्वच्छ वार्ड स्पर्धेतहि शहरातील ‘वार्ड क्रमांक १’ ने प्रथम क्रमांक पटकावत शहरात ‘वार्ड क्रमांक १’ वर्चस्व कायम राखले. या स्पर्धेचा निकाल प्रजासत्ताकदिनी जाहीर करण्यात आला असून विजेत्यांना नगराध्यक्ष चेतन चव्हाण व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करणेत आले.

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ - २४ अंतर्गत दोडामार्ग नगरपंचायतने पर्यावरण  फ्रेंडली बाप्पा व स्वच्छ वार्ड वं घरगुती गणेश उत्सव स्पर्धा आयोजित केली होती. या घरगुती गणेश उत्सव अंतर्गत असलेल्या इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धेमध्ये सुहास मनोहर परब यांनी प्रथम क्रमांक रोख रक्कम ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे बक्षीस पटकावले . तर अखिल अनिल पालकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावत रोख रक्कम ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तर साजन हिरोजी गवस यांनी तृतीय क्रमांक अंतर्गत रोख रक्कम २ हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पटकावले. उर्वरित पांडुरंग बोर्डेकर, महेश गवस, चार्वी गावडे, गिरीश कर्पे, सुरेश नाईक, हर्षद तांबुळकर, शेखर फाटक, विनया म्हावळणकर, राखी हळणकर, विद्याधर रेडकर, निधी मणेरीकर, ऋत्वेश म्हाडगुत, सर्वेश नाईक, अनुजा काळबेकर, व हरिश्चंद्र शिरोडकर या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

स्वच्छ वार्ड स्पर्धेत वार्ड क्रमांक १ ची कमाल 

स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत आयोजित स्वच्छ वार्ड स्पर्धेमध्ये वार्ड क्रमांक १ ने प्रथम क्रमांकाची बाजी मारत रोख रक्कम १० हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळविले. या सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात नगरपंचायत मध्ये गौरविण्यात आले. गटप्रमुख निधी नाईक, समीर रेडकर, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, सागर नाईक यांसह वार्ड क्रमांक १ च्या महिला वं नागरिकांनी  हा सन्मान नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी सर्व नगरपंचायतचे उप नगराध्यक्ष देविदास गावास, सभापती नितीन मणेरीकर, सभापती गौरी पार्सेकर, ज्योती जाधव यास्नः नगरसेवक, अधिकारी, खातेप्रमुख, नागरिक, व्यापारी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.