
चिपळूण : शहरातील मुंबई गोवा हायवे वरील डीबीजे महाविद्यालयची जांभई दगडाची संरक्षक भिंत अतिवृष्टीमुळे शुक्रवार, ता. 12 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास कोसळली. या भिंतीच्या दगड मातीच्या भरावाखाली सिद्धांत प्रदीप घाणेकर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
मुंबई गोवा महामार्ग चे काम सुरू असताना डिबीजे महाविद्यालयाची जागा संपादित झाली. त्यात महाविद्यालयाची जुनी संरक्षक भिंत तोडून तेथे महामार्ग लगत महाविद्यालयाच्या परिसरातला आरसीसी भिंत बांधण्यात आली आहे. त्या आयसीसी भिंतीवर मैदानाची जमीन आणि महाविद्यालयाकडे जाणार्या पायर्यांना समांतर अशी जांभा दगड आणि सिमेंट ची भिंत संस्थेकडून बांधण्यात आली होती. ही.वाढीव बांधकाम असलेली भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली. याच दरम्यान हायवे लगत संरक्षक भिंतीला लागून असलेल्या टपरीच्या आडोशाला सिद्धांत मित्राची वाट पाहत उभा होता.
मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील व सध्या लोटे येथे राहून डीबीजे कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेणारा सिद्धांत प्रदीप घाणेकर, वय १९ वर्षे शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता होता. रात्री उशीरापर्यंत सिद्धांत घरी आला नाही म्हणून रात्री 10 वाजताकुटुंबिय महाविद्यालय चौकशी साठी आले. त्यावेळी महाविद्यालयाकडून मित्र , नातेवाईक आणखी कुठे गेला असल्यास चौकशी करण्यास सांगण्यात आले.
आज शनिवार ता.13 जुलै, सकाळी 11 वाजता
महाविद्यालयाकडूून सिंध्दांतच्या मित्रांकडे चौकशी केल्यानंतर, सिद्धांतने संरक्षक भिंतीजवळील टपरीजवळून फोन केल्याचे समजले. त्यानंतर त्याच्या मोबाईलचे लोकेशन कॉलेजच्या या संरक्षक भिंतीच्या येथे दाखवले. तेव्हा भिंतीच्या ढिगाऱ्याखाली शोध घेतल्यावर सिद्धांत चा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे कॉलेज बंद ठेवण्यात आले होते.
चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक आपत्ती मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग च्या पालक यांचा जबाब नोंदवून, कामथे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सिद्धांत च्या पश्चात आई वडील, भारतीय सैन्यात असलेला मोठा भाऊ असा परिवार आहे.
महाविद्यालय प्रशासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याचा रु.५ लाख अपघात विमा घेतलेला आहे. त्याचा लाभ सिद्धांत च्या कुटुंबियांना मिळवून देण्यात येणार आहे. तसेच असे संस्थेकडून सांगण्यात आले.
तर शहरातील राजकीय प्रतिष्ठीतांशी बोलताना , ते म्हणाले घाणेकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांनी कष्ट करून शिकवलेला मुलगा अचानक अपघातात गेेला. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नवकोंकण संस्थेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे कळले.