कलमठ बाजारपेठे मध्ये दोन गटात राडा

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 17, 2023 23:12 PM
views 2892  views

कणकवली : कलमठ बाजारपेठ येथे एका नामांकित नेत्याच्या कार्यालयासमोर पारावर बसणाऱ्या परप्रांतीयांनी स्थानिक रहिवाशांना दादागिरी व धमकी दिल्याने स्थानिक व  परप्रांतीय यांच्यामध्ये राडा झाला. नेमके या राड्याचे कारण  समजू शकले नसले तरी दोघांमध्ये चांगलीच हातापायी झाली असल्याचे समजत आहे.ही घटना शुक्रवारी रात्री 9 ते 9.30 च्या सुमारास घडली. त्या परप्रांतीयांच्या विरोधात स्थानिकांनी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये या आधी  तक्रार देखील दाखल केली होती. पण त्याच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आज त्या परप्रांतीयांनी थेट स्थानिकांना  घरात घुसून धमकी देत मारण्याचा प्रयत्न केल्याने कलमठ मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या हे परप्रांतीय कलमठ मध्ये भाडोत्री म्हणून राहत असून त्यांनी आपली एक गॅंग देखील बनवली असल्याचे समजत आहे.