
वैभववाडी : 'नवसाला पावणारी' अशी ख्याती असणाऱ्या कुसुर गावच्या श्री. दारुबाईचा वाडिया जत्रोत्सव २२ व २३ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान मंडळाकडून करण्यात आले आहे.
कुसूर गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर दारुबाईचा वाडिया जत्रोत्सव २२ व २३ नोव्हेंबरला होत आहे. जत्रोत्सवाला २२ ला सायंकाळी प्रारंभ होणार आहे. या दिवशी रात्री देवतांचे पूजन, मांड भरणे, प्रसाद वाटप करणे आदी कार्यक्रम होणार आहेत. २३ नोव्हेंबरला सकाळपासून ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. कोरोनाकाळानंतर यावर्षी जत्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. जत्रेच्या नियोजनाबाबत नुकतीच गावकऱ्यांची बैठक देखील झाली.