यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात

'प्रतिबिंब पुस्तकाचे' स्पर्धा ठरली लक्षवेधी
Edited by: विनायक गांवस
Published on: October 16, 2022 17:56 PM
views 196  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये माजी राष्ट्रपती  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीप्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य गजानन भोसले व संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून व डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

आजच्या दिनानिमित्त आपल्या आवडत्या पुस्तकाचा आशय प्रतिकृतीद्वारे मांडण्यासाठी प्रतिबिंब पुस्तकाचे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

सर्व स्पर्धकांनी आपली आवडती पुस्तके व आशयाच्या कलाकृती संस्थेच्या लायब्ररीमध्ये मांडल्या होत्या. सदरचे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले..

कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता कॉलेजच्या ग्रंथपाल मानसी कुडतरकर व सहाय्यक शरद घारे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अमर प्रभू यांनी केले..