दोडामार्ग तहसिलदार कार्यालयाच्यावतीने मतदार जागृती रॅली !

राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य
Edited by: संदीप देसाई
Published on: January 25, 2024 06:07 AM
views 70  views

दोडामार्ग : २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्य साधून दोडामार्ग तहसीलदार कार्यालय व आमदार दीपकभाई विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाजारपेठेतून मतदार जागृती रॅली काढण्यात आली.

 या रॅलीत आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी विविधांगी मतदार जागृतीचे फलक घेऊन सहभागी झाले होते. दोडामार्ग निवडणूक शाखेचे अधिकारी या रॅलीचे नेतृत्व करत होते. रॅलीमध्ये मतदार राजा जागा हो, अशा घोषणा देत शहरात दोडामार्ग तहसील कार्यालय ते पिंपळेश्वर चौक अशी रॅली काढून जनजागृती करण्यात आली.