'व्हॉइस ऑफ मीडिया' जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 05, 2025 15:38 PM
views 77  views

सावंतवाडी : जगातील तब्बल ५१ देशांमध्ये पत्रकार बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'व्हाईस ऑफ मीडिया' या संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारी कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली.

सन २०२५ ते २०२७ या दोन वर्षांसाठी 'व्हॉइस ऑफ मीडिया' जिल्हा सिंधुदुर्ग कार्यकारिणी अध्यक्ष  प्रा. रुपेश पाटील, अनंत धोंड - कार्याध्यक्ष, भूषण सावंत - कार्याध्यक्ष, शैलेश मयेकर - सचिव, संजय पिळणकर - सहसचिव,अमित पालव  - उपाध्यक्ष, मिलिंद धुरी - उपाध्यक्ष, विष्णू धावडे - उपाध्यक्ष,आनंद कांडरकर - खजिनदार, समीर महाडेश्वर - संघटक, सीताराम गावडे- सल्लागार,राजेश नाईक - सल्लागार,बाळकृष्ण खरात - सल्लागार,दीपक पटेकर - प्रसिद्धी प्रमुख, परेश राऊत - सदस्य, विद्या बांदेकर - सदस्य, चिन्मय घोगळे - सदस्य, राजेंद्र दळवी - सदस्य, नागेश दुखंडे - सदस्य,प्रथमेश गवस - सदस्य, विवेक परब - सदस्य असून सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून सिद्धेश सावंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी साबाजी परब उपस्थित होते.

‌आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार बांधवांची एक चांगली संघटनात्मक बांधणी करून सकारात्मक पत्रकारितेच्या दृष्टीकोनातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रा. पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.