विवान भांगेचे बीडीएस परीक्षेत सुयश

कसबा केंद्रात प्रथम - देशात तिसावा
Edited by: मनोज पवार
Published on: March 28, 2025 10:37 AM
views 213  views

 संगमेश्वर :  संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावचा रहिवासी असलेला कु.विवान धनाजी भांगे यांने बीडीएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विवानने या परीक्षेत १०० पैकी ९४ गुण घेत राष्ट्रीय स्तरावर ३० वा क्रमांक पटकावला. या यशामुळे तो सुवर्ण पदकासाठी पात्र ठरला आहे. विवान हा संगमेश्वर येथील न्यू इंग्लिश स्कूल, कसबा येथील इंग्रजी माध्यमाचा विध्यार्थी या शाळेतील आहे.

विवान लहानपणापासूनच विविध उपक्रमात सहभागी होत असतो. तो वकृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धेत सहभागी होऊन नंबर पटकावत असतो. त्याला नृत्याची आवड असून तो सध्या अबॅकस स्पर्धेत ही ३ ऱ्या क्रमांकावरील राज्यस्तरावरील बक्षीस घेतले आहे. अबॅकस चे क्लास ची विशेष आवड आहे. विवानचे वडील संगमेश्वर येथील लिटिल स्टार प्री स्कूलचे संचालक असून कारभाटले विद्यालय येथे शिक्षक म्हणून ही कार्यरत आहेत. आई लिटील स्टार प्री स्कूल ला मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

विवानला अत्तार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.त्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक सौं अस्मा जुवळे, श्रद्धा रजपूत व इतर शिक्षिका यांनी कौतुक केले आहे. विवान च्या या यशाबद्दल कसबा पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.