
सावंतवाडी : येथील विठ्ठल राजाराम सावंत यांनी विधी शिक्षण पूर्ण करत L.L.B पदवी प्राप्त केली. व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज येथून त्यांनी ही पदवी प्राप्त केली. १८ वर्ष ॲड. संदीप निंबाळकर यांच्याकडे त्यांनी क्लर्क म्हणून काम केल.
या अनुभवातून त्यांना विधी क्षेत्रात आवड निर्माण झाली. सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानं गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझा यशाचं श्रेय माझे आई-वडील, चुलते, भाऊ तसेच ॲड. निंबाळकर व सहकारी यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.