मराठी शाळेला विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाची भेट !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 21, 2023 18:56 PM
views 64  views

देवगड : विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने जि. प. आदर्श प्राथमिक शाळा विजयदुर्गच्या मराठी शाळेत मुलांना मोफत संगणक शिक्षणासाठी नवीन उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाला दोन मोठे पंखे देण्यात आले. पंख्यांवर मंडळाचे नाव लिहिण्याचे काम माध्यमिक विद्यालय विजयदुर्गचे शिक्षक कुमार कांबळे यांनी केले. जि.प.आदर्श प्राथमिक शाळेच्यावतीने विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाने केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.