कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला अचानकपणे भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णसेवा सुरळीत आहे की नाही, रुग्णालयाचे कामकाज कसे चालते तसेच थेट भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.
चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे वैद्यकीय सेवा आणि कामकाज पहाण्यासाठी भेट दिली होती. या दरम्यान काही त्रुटी आढळल्या होत्या. त्याच धर्तीवर मंगळवारी पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक श्री पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे भेट देऊन रुग्णालयाची पहाणी केली. जिल्हा शल्य चिकित्सक श्री. पाटील यांनी भेट दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. अनेकांची तारांबळ देखील उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाशल्य चिकित्सक श्री. पाटील यांनी खास करून रुग्णांना चांगल्या दर्जाची रुग्णसेवा मिळते काय, तसेच कामकाज कशा पद्धतीने सुरू आहे, या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुग्णांना देखील त्या दर्जाच्या सेवा सुविधा मिळतात काय यांची माहिती घेतली.