हिंदू - मुस्लीम एकतेचं दर्शन ; कलमठ शिवसेनेनं दिला समानतेचा संदेश

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 20, 2023 11:31 AM
views 687  views

कणकवली : सध्या बऱ्याच ठिकाणी हिंदू - मुस्लीम असा वाद सुरु आहे. मात्र सिंधुदुर्गातल्या कलमठ शिवसेनेने आदर्श उदाहरण आपल्या कृतीतून दाखवत हिंदू - मुस्लीम एकतेच दर्शन घडवलं.  कलमठ बाजारपेठ ठाकरे गटाच्यावतीने मुस्लीम बांधवांंना ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

एकीकडे धर्मावरून राजकारण करत समाजात विष पेरलं जात असताना कलमठ ठाकरे गटाने केलेली ही कृती नक्कीच कौतुकास्पद अशीच आहे. हिंदू - मुस्लीम सर्वधर्म समभाव या उद्देशाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सामाजिक संदेश दिला आहे. तसेच कलमठ बाजारपेठ ठाकरे गटाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे बॅनर लावण्यात आले.  ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग, धीरज मिस्त्री, सचिन खोचरे, व महिला सदस्यांच्यावतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला.