सावंतवाडीत विश्व हिंदू परिषदेचं संमेलन उत्साहात..!

▪️ धर्म, संस्कृती जपण्यासाठी एकत्रित या : लखमराजे भोंसले
Edited by: विनायक गांवस
Published on: August 30, 2024 09:57 AM
views 125  views

सावंतवाडी : मोबाईमुळे लोकांमधला संवाद दूर झाला आहे. धर्म, संस्कृती जपण्यासाठी एकत्र येऊन चर्चा करणं आवश्यक आहे. एकमेकांना मदत करून पुढे जाण आवश्यक असताना आपण एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्त आहोत. ते थांबल पाहिजे. एकमेकांचे पाय न ओढता दुसऱ्यापेक्षा आपलं चांगलं कसं करता येईल याचा विचार करायला हवा असं प्रतिपादन युवराज लखमराजे भोंसले यांनी केले. सावंतवाडीतील विश्व हिंदू परिषद षष्ठीपूर्ती हिंदू संमेलनावेळी ते बोलत होते. ‌

सावंतवाडी येथील आत्मेश्वर मंदीर येथे विश्व हिंदू परिषद षष्ठीपूर्ती हिंदू संमेलन शेकडो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाल. यावेळी मार्गदर्शन करताना सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, आपल्या मुलांना घरामध्ये आपण कोणते संस्कार देतो हे महत्त्वाचे आहे‌. आपल्या शाळा व इतर शाळांच्या संस्कृतीत खूप फरक दिसतो. मी तो फरक स्वतः अनुभवलेला आहे. मुलांना आपण काय शिक्षण देतो हे महत्त्वाचे आहे‌. आजच्या काळात आपण सगळे एकत्र येणं आवश्यक आहे. आपल्या धर्माचा प्रसार व प्रचार करण आवश्यक आहे. हिंदू धर्मात नमस्कार करणं, देवाला प्रार्थना करण एवढ्याच गोष्टी मर्यादित नाहीत. धर्मात भरपूर गोष्टी आहेत ज्याचे आकलन आपण केलं पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे. आजकाल लोकांमधला संवाद मोबाईलमुळे दूर झाला आहे. तो पुन्हा झाला पाहिजे. एकत्र येणं, आपल्या अडचणींबाबत बोलण, चर्चा करणं आवश्यक आहे. त्यामुळे होणारे दुष्परिणाम दूर होतील. तसेच एकमेकांना मदत करून पुढे जाण फार आवश्यक आहे. परंतु, आपण एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्त आहोत. ते थांबल पाहिजे, ही गोष्ट चुकीची आहे. दुसऱ्यापेक्षा चांगलं कसं करता येईल याचा विचार करावा. दोघांनाही पुढे जायचं असेल तर पाय ओढण बंद झालं पाहिजे असं मत लखमराजेंनी व्यक्त केले.  

दरम्यान, हिंदू जन जागरण समितीचे हेमंत मणेरीकर, विहिंप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पुराणिक, विहिंप जिल्हा अध्यक्ष केशव फाटक आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हिंदू धर्म व संस्कृती जपण्यासाठी जागरूक राहाण्याचे आवाहन त्यांनी केलं. सावंतवाडी येथील आत्मेश्वर मंदिरात हे सावंतवाडी प्रखंडातील हिंदू संमेलन संपन्न झाले. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, विहिंप अध्यक्ष केशव फाटक, उपाध्यक्ष सुभाष पुराणिक, हिंदू जन जागरण समितीचे हेमंत मणेरीकर,लालिन तेली, डॉ. रेवती लेले, अँड. अश्विनी लेले, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सुधीर आडीवरेकर, शैलैश पै, अण्णा म्हापसेकर, विनायक रांगणेकर, किशोर चिटणीस, स्वागत नाटेकर, मोहिनी मडगावकर आदींसह शेकडो हिंदू बांधव- भगिनी उपस्थित होते.