विष्णु माणगावकर यांचा 'राष्ट्रीय लक्षवेध' कर्तुत्ववान पुरस्काराने सन्मान

Edited by:
Published on: January 27, 2025 14:45 PM
views 130  views

सावंतवाडी : ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विष्णु गंगाराम माणगावकर यांना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय, कला , क्रिडा, दशावतार, पर्यटन अश्या विविध क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील " राष्ट्रीय लक्षवेध कर्तुत्ववान पुरस्काराने सन्मानित" करण्यात आले. 

जीवन संघर्ष फाऊंडेशन बेळगाव व एशियन टॅलेंट बूक ऑफ पब्लिकेशन यांच्यावतीने राष्ट्रीय कला संस्कृती संमेलन लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे आयोजित करण्यात आलं होत. यावेळी विद्यार्थीप्रिय कला शिक्षक तसेच गेली अनेक वर्षे कलेला प्रोत्साहन मिळावं म्हणुन कला प्रशिक्षण विविध उपक्रम आणि विविध शासकीय योजनेचे प्रशिक्षक तसेच सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील , समाजातील विविध सांस्कृतिक,सामाजिक कार्याप्रति सन्मान म्हणून गुरूवर्य  परशुरामभाऊ नंदिहल्ली माजी आमदार बेळगाव, रमाकांत खलप माजी केंद्रीय कायदा मंत्री या मान्यवरांच्या  शुभहस्ते राष्ट्रीय लक्षवेध कर्तुत्ववान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. 

यापुर्वी ही विष्णु माणगावकर यांना राज्यस्तरीय युवा चित्रकार पुरस्कार 2014, कलाश्री पुरस्कार 2017, राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार 2017, सांस्कृतिक साहित्य पुरस्कार 2017, महाराष्ट्र कला शिव सन्मान 2023, महाराष्ट्र कलारत्न गौरव पुरस्कार 2023 , उत्कृष्ट कला शिक्षक पुरस्कार 2023, महाराष्ट्र कला रत्न पुरस्कार 2023 पुणे art beat तर्फे  कला गौरव पुरस्कार 2023 शिव सह्याद्री " ग्लोबल आयडियल टीचर अवॉर्ड २०२४ अश्या अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विष्णु माणगावकर यांचे सर्वत्र सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक आणि राजकिय क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे.