बहिवक्र आरसे बसवत अपघात टाळण्यासाठी विशाल सेवा फाऊंडेशनचा पुढाकार

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाचा शुभारंभ
Edited by: भरत केसरकर
Published on: April 10, 2023 12:38 PM
views 257  views

सावंतवाडी : अपघात टाळण्यासाठी सावंतवाडी शहरात केलेला बहिवक्र आरसे बसून विशाल सेवा फाउंडेशन कडून शहरात राबविण्यात आलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे मत माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा भाजपचे प्रवक्ते संजू परब यांनी व्यक्त केले. भविष्यात विशाल सेवा फाउंडेशन कडून असेच उपक्रम होत राहूदेत अशा शुभेच्छा ही त्यांनी यावेळी दिल्या. शालेय विद्यार्थी तसेच वाहन चालकांना होणारे अपघात लक्षात घेता शहरात तब्बल 20 ठिकाणी बहिर्वक्र आरसे विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने बसवण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

टप्प्याटप्प्याने विविध ठिकाणी हे आरसे बसवण्यात येणार आहेत. भविष्यातही विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून असेच सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील असे आश्वासनही यावेळी विशाल परब यांनी दिले.

   यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर,चराठा उपसरपंच अमित परब, विनोद सावंत, अनिल सावंत आदी उपस्थित होते

     विशाल सेवा फाउंडेशनच्यावतीने संस्थापक विशाल परब यांनी नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत..