
कणकवली : कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था आयोजित अभंगवाणी कार्यक्रमाचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अभंगवाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या युवा नेते विशाल परब यांचा यावेळी गौरव करण्यात आला. विशाल परब, विश्वास प्रभुदेसाई, बुवा प्रकाश पारकर, सुदर्शन फोपे, पंढरीनाथ जाधव तसेच संस्थेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संगीत क्षेत्रातील युवक-युवतींना संबोधित करताना विशाल परब आपल्या भाषणात म्हणाले की, भजन क्षेत्राचा समाज प्रबोधन करण्यात जो मोठा वाटा आहे त्याची तुलना आपण कशाचीच करू शकत नाही. त्यामुळे जे तुम्ही कार्य करताय ते ईश्वर कार्य आहे. तुम्हाला नेहमीच चांगल्या पद्धतीची मदत विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात येईल.
कार्यक्रमात सिंधुदुर्गातील विविध ३२ भजनी बुवांचा सत्कार करण्यात आला.