
भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशाल परब यांच्या माध्यमातून विशाल सेवा फाउंडेशन आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आयोजित शिवगर्जना महानाट्याचे कुडाळ येथे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते. गेली तीन दिवस चाललेल्या या महानाट्याच्या अंतिम दिवशी शिवप्रेमी जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भावना विवश झालेल्या विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा विशाल परब यांनी आभार व्यक्त करताना सर्व शिवप्रेमींंसमोर नतमस्तक होऊन आपल्या संयमी आणि नम्रतेचे दर्शन दाखवून दिले.
त्यांनी केलेल्या या वेगळ्या प्रयोगाने जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी जनता आनंदली असून त्यांनी मनापासून विशाल परब यांना आशीर्वाद दिले आहेत. याही पुढे अशा रीतीने आपण लोकांच्या सेवेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध राहणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी धावून असतात जाणारे असल्याचे विशाल परब यांनी यावेळी बोलताना सांगितले.