
वेंगुर्ले : दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्लेत दिव्यांग बांधवांसोबत आपला वाढदिवस साजरा करत दिव्यांगांना शिधा वाटप केले.
भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मराठवाडा पुरग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहानुभूती राखत यावर्षी आपला वाढदिवस कोणत्याही जल्लोषपुर्ण कार्यक्रमाने साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी आपली मदत दिली. तसेच सावंतवाडी मतदारसंघात विविध सामाजिक सेवा-कार्यक्रम व उपक्रमाद्वारे त्यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. विशाल परब यांच्या संकल्पनेतून,भारतीय जनता पार्टी व दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्ला साई मंगल कार्यालय येथे दिव्यांगाना शिधावाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच आज जागतिक अंध दिन व जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त या कार्यक्रमात उपस्थित अंध बांधवांना पांढऱ्या काठीचे वाटपही विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला तालुक्यासहित जिल्ह्यातील असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते. अंध बांधवांच्या पांढऱ्या काठीला विशाल परब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना शिधा वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे युवा नेते विशाल परब, तालुकाध्यक्ष पप्पू परब, भाजपाचे प्रदेश सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, जिल्हा सरचिटणीस साईप्रसाद नाईक, जिल्हा सदस्य सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस वसंत तांडेल, मच्छिमार नेते दादा केळुसकर, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, जिल्हा उपाध्यक्ष ऍड सुषमा प्रभू खानोलकर, जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, महिला मोर्चा सरचिटणीस रसिका मठकर, महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, सरचिटणीस प्रार्थना हळदणकर, अल्पसंख्यांक सेलच्या हसिनाबेग मकानदार, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, आकांक्षा परब, युवामोर्चा तालुका अध्यक्ष प्रणव वायंगणकर, माजी शहर अध्यक्ष रविंद्र शिरसाट, माजी नगरसेवक अभिषेक वेंगुर्लेकर, हितेश धुरी, भुषण आंगचेकर, पुंडलिक हळदणकर, जयंत मोंडकर, सचिन शेट्ये, गौरव खानोलकर, कुणाल तारी, सोमा मेस्त्री आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले.