तळकोकणात 'ठाकरे गटाला' विशाल परब यांचा धक्का..!

तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या गावात 'सर्जिकल स्ट्राईक'
Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2024 16:26 PM
views 612  views

सावंतवाडी : तळकोकणातील सावंतवाडी तालुक्यात भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला आहे. उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या गावातील तब्बल ५० हून अधीक शिवसैनिकांनी भाजपच कमळ हाती घेतलं आहे. विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश नेमळे गावात पार पडला. ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या होमपीचवर त्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही विकासाला महत्त्व देतो. त्यामुळे अनेकजण आज भाजपात प्रवेश करत आहेत. येणाऱ्या काळात विकासाची गंगा गावागावापर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी नारायण राणे यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी नेमळे येथे केले.

  नेमळे वेंगुर्लेकरवाडी येथे नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या माध्यमातून विशाल परब यांच्या उपस्थितीत शेकडो ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये प्रथमेश गुडेकर, शांताराम गुडेकर, शांती गुडेकर, किरण गुडेकर, शांताराम वेंगुर्लेकर, वैशाली कानसे, गौरी कानसे आदींसह तब्बल ५० ठाकरे सैनिकांनी मशालीची साथ सोडत भारतीय जनता पार्टीच कमळ हात घेतलं. 

यावेळी ॲड.अनिल केसरकर, गाव अध्यक्ष मनोहर राऊळ आदी उपस्थित होते. विशाल परब म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचारावर प्रेरित होऊन आज असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल होत आहेत. आजचा हा प्रवेश म्हणजेच त्याचेच फलित आहे. निश्चितच भाजपावर टाकलेला विश्वास पाहता भाजपाचा कार्यकर्ता म्हणून विशाल परब नेमळे गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहील अस वचन त्यांनी ग्रामस्थांना दिलं.